अंधेरीत मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थेची आवश्यकता ओळखून विद्या विकास मंडळाने विद्या विकास मंडळ विद्यालयाची सुरुवात १९५७ साली केली. विशिष्ट ध्येयवादाने प्रेरीत होऊन स्थापन करण्यात आलेल्या ह्या संस्थेने मागील ६७ वर्षांत शिक्षण क्षेत्रात आपले एक विशिष्ट स्थान निर्माण करण्याच्या जिद्दीने प्रगतीचे अनेक टप्पे गाठले आहेत. विद्यालयातून शालान्त बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कारित होऊन बाहेर पडावा या उद्देशाने त्यांना शिक्षणाबरोबरच कला, क्रिडा व विज्ञान – तंत्रज्ञान यामध्ये नवी दृष्टी देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. मुलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा या करिता स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्नेहसंमेलनानिमित्त रांगोळी, हस्तव्यवसाय, चित्रकला, किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणे, आकाश कंदील, शुभेच्छापत्रे तयार करणे, विज्ञान प्रदर्थन भरविण्यात येते .