‘ चिंचेच्या पानावर बांधले देवालय आधी कळस मग पाया रे’ या उक्तीप्रमाणे विद्या विकास मंडळ संस्थेने १९५७ साली विद्यालयाची स्थापना केली व १९६२ साली प्राथमिक विभागाची सुरुवात केली. १९६२ साली झोपडीवजा इमारत चार वर्गांनी सुरु झालेली शाळा १९८२ साली आपले अष्टभूज सांभाळत चार मजली इमारतीत आनंदाने सुखावत आहे. राष्ट्राचे भावी आधारस्तंभ म्हणजेच आमचे विद्यार्थी त्यांची शारीरिक मानसिक व बौद्धिक वाढ होण्यासाठी आमचा प्रयत्न असतो.मुलांना संयमाची, एकाग्रतेची, आत्मविश्वासाची, कलोपासनेची सवय लागावी म्हणून विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक वर्गाला कलाकौशल्य दाखविण्याची स्वतंत्र संधी दिली जाते. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होण्यासाठी शाळा सुरु झाल्यावर पहिली वीस मिनिटे परिपाठासाठी दिली जातात. मुलांची संग्रहवृत्ती वाढून जिज्ञासावृत्ती व कल्पनाशक्ती विकसित व्हावी महणून त्यांना प्रकल्प दिले जातात. भारतीय संस्कारांचे महत्व जाणून त्यादृष्टीने धार्मिक व राष्ट्रीय सण उत्सव साजरे केले जातात.