preloder
Top
Vidya Vikas Mandal | Marathi School in mumbai

विद्या विकास मंडळ संस्थेची स्थापना २० जून १९५६ रोजी झाली.

ध्येय 
  • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास
  • सर्वसामान्यांना शिक्षणाची समान संधी
  • मातृभाषेतून शिक्षणाचा संस्कार

कला – ज्ञान – क्रीडा अशा सर्व अंगांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांचा विकास उपजत गुण व बलस्थानांची जोपासना व संवर्धन ज्ञाननिर्मितीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न
जागतिक दर्जाचे, समाजोपयोगी, रोजगाराभिमुख शिक्षण, निकोप स्पर्धावृत्ती व नेतृत्व गुणांचा विकास, जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, सर्जनशीलता आणि कलाविषयक जाणीवा जोपासणे सुसंस्कृत आणि संवेदनशील मन असलेला तसेच विवेकवादी, व जबाबदार नागरिक घडविणे, समता, बंधुभाव, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय व अहिंसा ही लोकशाहीची आणि मानवतेची मूल्ये रुजविणे.

मुलांना शिकवताना त्यांच्या शिक्षणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडलेल्या सर्वांनी एकमेकांच्या सहाय्याने स्वतः समृद्ध होण्यासाठी आणि विद्यार्थांना समृद्ध होण्यासाठी मदत करणे; शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे. शिक्षकांनी प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता जोपासावी, या हेतूने प्रशिक्षणे, कार्यशाळा, व्याख्याने, शैक्षणिक सहली इत्यादींचे आयोजन करणे; शिक्षण व्यवस्थेशी संबंधित शासनाची धोरणे, कायदे, नियम, निर्णय, त्यांची अंमलबजावणी अशा विविध विषयांचा अभ्यास करून आवश्यक ती कार्यवाही करणे; ही कामे करताना इतर शिक्षण संस्था व शाळांनाही त्यात जोडून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे.
  • माध्यमविषयक धोरण
  • शिकण्याची नैसर्गिक भाषा म्हणून आणि समाज व संस्कृतीशी समरस होण्यासाठी मराठी माध्यमाचा स्वीकार
  • ज्ञानाचा एक महत्त्वाचा स्रोत आणि जगाची संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचे उत्तम शिक्षण देण्यासाठी खास प्रयत्न.