अंधेरीच्या शैक्षणिक संस्थेचा इतिहास पाहू लागता गेल्या अनेक अंधेरीकर पिढ्यांना शिक्षण देण्याचा मान गुजराती संस्थेकडे जातो, आज त्यांच्या तीन मोठ्या शाळा उभ्या आहेत. इंग्रजी बोलीची जोपासना करण्यासाठी ख्रिस्ती धर्मीयांच्या तीन शाळा आहेत. परंतु इ.स. १९५६ साली बारा ध्येयवादी तरुण तरुणींनी सुरु केलेल्या विद्या विकास मंडळाने अंधेरी परिसरात गेल्या पन्नास वर्षात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपणा सर्वांस अभिमान वाटावा असा ठसा उमटवला आहे.

इ. स. १९५६ साली अंधेरीच्या पाऊण लाख वस्तीत मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची उणीव होती. सांस्कृतिक विकासासाठी अनेक केंद्रे इतर भाषिकांना उपलब्ध असली तरी मराठी भाषिकांसाठी मात्र तसे एक ही केंद्र स्थापन झाले नव्हते. एवढेच नव्हे तर मराठी मायबोली असलेल्या समाजाची एकही सार्वजनिक वस्तू ह्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या एवढ्या मोठ्या विभागात नव्हती. तेव्हा मराठी भाषिकांच्या अस्मितेला लागलेला कलंक धुवून काढण्याचा वा एकाच इर्षेने सर्वजण पेटले आणि विद्या विकास मंडळाने जन्म घेतला.

 
 

संकेतस्थळावरील माहितीचे अधिकार राखिव © २०१८
रचना आणि मांडणी - बियाँड वेब